22 ऑगस्ट : सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयात डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी मार्डचे डॉक्टर उद्या (शनिवारी) सामूहिक रजेवर जाणार आहेत.
या प्रकरणी सोलापूर जनरल मेडिकल कॉलेजच्या डीनची बदली करण्याची मागणी त्यांनी केलीय. त्याशिवाय मार्ड डॉक्टरांशी संबंधित इतर अनेक मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत. सोलापूरमध्ये डॉ. वैशंपायन स्मृती मेडिकल कॉलेजमधले निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी आत्महत्या केली होती.
या प्रकरणी चार वरिष्ठ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉ. किरणनाआत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. पण सोलापूर जिल्हा न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.
दुसरीकडे जाधव यांच्या आईला अहमदनगरमधल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांना 50 लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी मार्डच्या डॉक्टरांनी केलीय. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात जामखेडमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कोल्हाटी समाजातल्या तमाशातील कलावंत महिलाही सहभागी झाल्या होत्या. या घटनेशी संबंधित डॉक्टरांना अटकेची मागणी यावेळी करण्यात आली.
मार्डच्या मागण्या
Follow @ibnlokmattv |