'त्या' अपघातात जखमी झालेली स्वप्नाली कोमातून बाहेर

'त्या' अपघातात जखमी झालेली स्वप्नाली कोमातून बाहेर

  • Share this:

swapnali lad22 ऑगस्ट : ठाण्यात काही दिवसांपूर्वी आपल्या रिक्षा एकटी मुलगी प्रवासी पाहून रिक्षा ड्रायव्हरने भलतीकडेच रिक्षा नेत असल्याचं लक्षात येताच एका तरुणीने चालत्या रिक्षातून उडी घेतली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेली स्वप्नाली लाड तब्बल 20 दिवसांनंतर कोमातून बाहेर आली आहे.

स्वप्नालीच्या मेंदूला मार बसला असून, तिची दोन मोठी ऑपरेशन्सही झाली आहेत. तिच्यावर ठाण्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीच आयसीयूमधून तिला खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आलंय.

दरम्यान, स्वप्नालीला फसवून दुसरीकडे नेऊ इच्छिणारा रिक्षाचालक मात्र अजूनही फरारच आहे. गंभीर जखमी झालेल्या स्वप्नालीने प्रसंगावधान दाखवून दवाखान्यात दाखल करणार्‍या नगरसेविका उषा भोईर यांचा सत्कार करण्याचं ठाणे महापालिकेनं ठरवलंय.

Follow @ibnlokmattv

First Published: Aug 22, 2014 06:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading