ठाण्याच्या महापौरांचा फतवा, आधी मॅरेथॉननंतर बाप्पासाठी मंडप !

ठाण्याच्या महापौरांचा फतवा, आधी मॅरेथॉननंतर बाप्पासाठी मंडप !

  • Share this:

thane mayor harichandra patil21 ऑगस्ट : ठाणे महापालिकेच्या महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी एक अजब फतवा काढलाय. 24 तारखेला ठाण्यात होणार्‍या महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या नंतरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेची परवानगी देण्यात यावी असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाण्यातील गणेशोत्सव मंडळ आणि विरोधकांनी महापौरांच्या या आदेशांचा निषेध केला आहे आणि अशा कृतीविरोधात गरज पडल्यास आंदोलनाची तयारी दर्शवली आहे.

ठाणे महानगर पालिकेची 25 वर्ष मॅरेथॉन 24 ऑगस्ट रोजी आहे. या मॅरेथॉनच्या मार्गातील सर्व गणेशोत्सव मंडळांना पालिकेनी 24 तारखेनंतर मंडप उभारण्याची परवानगी द्यावी असा आदेश महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिलाय.दोन तासांच्या मॅरेथॉनसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. ठाण्यातील महापौरांच्या या अजब आदेशामुळे गणेशोत्सव मंडळ नाराज झाले आहेत. मात्र महापौर ही मॅरेथॉन ठाण्याचे कौतुक असल्याचे सांगत आहेत.

महापौरांच्या या आदेशाची खिल्ली विरोधकांनी उडवलीय आणि कोणताही विचार न करता साधे दिग्दर्शिका ही न पाहता देण्यात आलेल्या आदेश असल्याचे विरोधकांनी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सांगितले आहे. पाच दिवसात कसा मंडप उभारायचा आणि कसा देखावा बनवायचा असा प्रश्न या मंडळांना पडलाय.

महापौरांच्या या आदेशाने पालिकेच्या प्रशासनात खळबळ निर्माण झालीय आता अनेक मंडळानी या आधीच परवानगी घेवून मंडपाच्या आणि देखाव्याच्या कामाला सुरूवातही केलीय या आदेशामुळे ठाण्यात महापौर विरोधी वातावरण निर्माण झालाय.

Follow @ibnlokmattv

First published: August 21, 2014, 9:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading