Elec-widget

पाकिस्तानात लष्कराच्या हस्तक्षेपानंतर इम्रान खान यांची सरकारशी चर्चा

पाकिस्तानात लष्कराच्या हस्तक्षेपानंतर इम्रान खान यांची सरकारशी चर्चा

  • Share this:

Imran-Khan-Pakistan-Parliament-Protest-PTI

21 ऑगस्ट :  पाकिस्तानातील पंतप्रधानांविरोधात इम्रान खान यांनी सुरू केलेले आंदोलन अधिकच चिघळतंय. लष्कराच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानातल्या राजकीय संकटावर तोडगा निघताना दिसतोय.

आधी चर्चेला नकार देणारे तेहरीक ए इन्साफचे प्रमुख इम्रान खान काल सरकारबरोबर चर्चेसाठी तयार झाले. पण, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, या मागणीवर ते ठाम आहेत. चर्चेची दुसरी फेरी आज होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधानांचे निवासस्थान, राष्ट्रपतींचे निवासस्थान, सर्वोच्च न्यायालय आणि अनेक देशांचे दूतावास असलेल्या चौकात आम्ही स्वातंत्र्य साजरे करणार आहोत, असे इम्रान यांनी ट्विटवर म्हटले आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2014 02:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...