शुभगृह योजनेला थंड प्रतिसाद

शुभगृह योजनेला थंड प्रतिसाद

13 मे 2009ऋतुजा मोरेगेल्या पाच दिवसांत ग्राहकांनी टाटांच्या शुभगृह योजनेला काहीसा थंड प्रतिसाद दिल्याचं समजतंय. 9 मे ते 19 मे दरम्यान टाटांच्या शुभ गृह योजनेसाठीच्या घरांच्या फॉर्मची विक्री सुरु झाली आहे. स्टेट बँकेच्या ठाणे, डहाणू, बोरिवली, अंधेरी, पालघर, विरार, वसई, नालासोपारा, सांताक्रुझ,बोईसर या दहा शाखांमध्ये हे फॉर्स उपलब्ध आहेत. इच्छुकांनी फॉर्म घेताना 200 रु फॉर्म शुल्क म्हणून भरायचे आहेत. एका ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, टाटांचा हा प्रोजेक्ट बोईसर इथं उभा राहणार आहे. बोईसर हा भाग मुंबईपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. हे घर घेऊनही दररोज नोकरीसाठी मुंबईत यावं लागेल. त्यामुळे वाहतूक खर्च वाढणार आहे. पण केवळ टाटांचा ब्रँड आहे म्हणून घरं घेण्याचा विचार करणारे ग्राहकही हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. शुभ गृह योजनेची तुलना म्हाडाच्या घरांशी केली जात आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठीचा ग्राहकांचा प्रतिसाद पाहता टाटांच्या या योजनेला ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्याचवेळी म्हाडाच्या घराचं बांधकामही पूर्ण झालं होतं. तरीही कदाचित 19 मेपर्यंत शुभगृह योजनेलाही भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2009 05:06 PM IST

ताज्या बातम्या