गोविंदांनो, पोलिसांची आहे तुमच्यावर करडी नजर

गोविंदांनो, पोलिसांची आहे तुमच्यावर करडी नजर

  • Share this:

govinda_police18 ऑगस्ट : गोविंदा आला रे..म्हणत मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. खास करुन मुंबईत दहीहंडीची मजा काही औरच असते. मुंबईत सकाळपासून हजारोंचा गोविंदा रस्त्यावर उतरले आहे. मात्र अशा गर्दीच्या वेळी कायदा- सुव्यवस्थेचा बंदोबस्त ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलिसांची असते.

दहीहंडी आणि जन्माष्टमीच्या बंदोबस्तासाठी सुमारे 30 हजार पोलीस रविवारपासून कामावर आहेत. पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून त्यांना सुरक्षाव्यवस्थेसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार 12 वर्षांच्या खालील मुलांना दहीहंडीत सहभागी न होण्याचे आदेश आहेत, त्यावरही लक्ष ठेवण्याच्या पोलिसांना सूचना आहेत. ज्या ठिकाणी बालगोविंदांचा सहभाग असेल अशा पथकांवर कारवाई केली जाणार आहे.

#ibnldahihandi

Follow @ibnlokmattv

First published: August 18, 2014, 2:08 PM IST

ताज्या बातम्या