वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका निवासी डॉक्टराची आत्महत्या

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका निवासी डॉक्टराची आत्महत्या

  • Share this:

solapur doctor

17 ऑगस्ट : सोलापुरातल्या डॉ.वैशंपायन स्मृती मेडिकल कॉलेजमधल्या एका निवासी डॉक्टरानं काल संध्याकाळी आत्महत्या केली. डॉक्टर किरण जाधव असं त्यांचं नाव आहे. डॉक्टर किरण हे एमडीच्या दुसर्‍या वर्षाला होते. हॉस्पिटलच्या रेस्टरूममध्ये त्यांचा मृतदेह सापडलाय. वरिष्ठ डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, अशी सुसाईड नोट डॉ.किरण यांनी लिहिली आहे.

या प्रकरणी 4 वरिष्ठ डॉक्टरांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.सुनील घाटे, डॉ. एच.एस. सरवदे, डॉ. निलोफर बोरी आणि सचिन बंदिछोडे या चौघांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डॉक्टर किरण एका लावणी कलावंताचा मुलगा असून जाधव यांच्या आत्महत्येला जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहेत. तीन जणांची चौकशी समिती मुंबईतून पाठवली आहे. डॉ. किरण जाधव यांचे आत्महत्या प्रकरण दुर्देवी असून आत्महत्येला जबाबबदार असणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा देणार अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयबीएन लोकमतला बोलताना दिली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 17, 2014, 6:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading