हिंगोलीत पूर्णा-अकोला पॅसेंजरवर दरोडा, 10 जणं जखमी

हिंगोलीत पूर्णा-अकोला पॅसेंजरवर दरोडा, 10 जणं जखमी

  • Share this:

IMG_1087-640x480

17 ऑगस्ट :  हिंगोली जिल्ह्यातील नांदापूरजवळ पूर्णा-अकोला पॅसेंजरवर रात्री दोनच्या सुमारास दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी प्रवाशांना मारहाण करून रोख रक्कम आणि दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून रविवारी सकाळी दरोडेखोरांना पकडलं. मात्र या हल्ल्यात 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी झाले असून यात महिला प्रवाशांचाही समावेश आहे.

दरम्यान, जखमींना हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या प्रकरणी नांदेड रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2014 11:13 AM IST

ताज्या बातम्या