वडिलोपार्जित संपत्तीत मुलींनाही मिळणार समान वाटा !

वडिलोपार्जित संपत्तीत मुलींनाही मिळणार समान वाटा !

  • Share this:

father property to daughter14 ऑगस्ट : वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना आता समान वाटा मिळणार आहे. एका खटल्याच्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. मुंबई हायकोर्टाने आज एका प्ररकरणात एतिहासिक निकाल दिला आहे. मुलींच्या वारसाहक्का बाबतचं हे प्रकरण आहे. मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळणार आहे.

मुंबई हायकोर्टाच्या तीन सदस्यांच्या खंडपिठाने आज हा निर्णय दिला आहे. मुलींना वडिलांच्या संपतीत हिस्सा देण्याच्या एका गुंतागुंतीच्या खटल्या बाबत हायकोर्टाने तीन सदस्यांचं खंडपीठ स्थापन केल होतं. त्या खंडपिठात मुख्य न्यायमुर्ती मोहित शहा, न्यायमूर्ती एम.एस.सोनक आणि न्यायमूर्ती एम.एस संकलेच्या यांच्या खंडपिठाने हा निर्णंय दिला आहे.

मुलींना वडिलोपार्जित संपतीत वाटा मिळण्या बाबत हिंदू वारसा हक्क कायदा-1956 हा कायदा होता. या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीत मुलीला वगळून वाटणी व्हायची. त्यानंतर वडिलांना जो वाटा मिळाला असेल त्याची पुन्हा मुलांच्या संख्येनुसार वाटणी व्हायची आणि त्यात सर्व मुलांना समान हिस्सा मिळायचा. 1994 सालात कायद्यात चार राज्यात बदल करण्यात आला. 1994 सालानंतर ज्या मुलींच लग्न झालंय त्यांना वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा मिळेल अशी तरतूद केली. आणि ज्या मुलींची लग्न 1994 सालाच्या आधी झालं आहे.

त्या मुलीला 1956 च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. या चार राज्याने केलेल्या बदलानुसार 2005 सालात केंद्र सरकारने ही तसाचं बदल केला. मात्र, त्यात 2005 सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार असा बदल करण्यात आला. मात्र, त्यानंतर दोन मुद्दे उपस्थित झाले ते म्हणजे ज्या मुलींच लग्न 1994 झाला आधी झालं आहे आणि ज्या मुली 2005 नंतर जन्म झाला आहे.

त्यांचं काय ? या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या दोन न्यायमूतीर्ंनी वेगवेगळा न्याय दिला होता. यामुळे मुख्य न्यायमुतीर्ंनी तीन सदस्यांचं विशेष खंडपिठाची स्थापना करण्यात आली.या खंडपिठाने हा निकाला दिला आहे. त्यानुसार आता सर्वच मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना समान वाटा मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 14, 2014, 11:06 PM IST

ताज्या बातम्या