S M L

धनगर समाजाचं आंदोलन राज्यभर पेटलं

Samruddha Bhambure | Updated On: Aug 14, 2014 04:40 PM IST

धनगर समाजाचं आंदोलन राज्यभर पेटलं

14 ऑगस्ट : आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, धनगर समाजाचं तिसर्‍या सूचीत समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणावरून रण पेटले. त्यांच्यापाठोपाठ इतरही समाजांनी आरक्षणाची मागणी सुरू केलीय. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर आता राज्य सरकारने मधला मार्ग काढला आहे. मात्र धनगर समाजाच्या नेत्यांनी या आरक्षणाला विरोध केला आहे. याचे तीव्र पडसाद म्हणून धनगर समाजाने फक्त एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, बारामतीत ठिकठिकाणी धनगर समाजाचे हजारो कार्यकर्ते रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलन करत आहेत.

आदिवासी कोट्याच्या बाहेर आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी दिली आहे. त्यामुळे एसटी प्रवर्गात आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा जानकर यांनी दिला आहे. तर दुसरीकडे धनगर आरक्षण कृती समितीच्या नेत्यांनीही आदिवासी समाजातच आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे.मुंबईतील कुर्ला स्टेशनवर आंदोलकांनी रेल रोको आंदोलन केलं. पुण्यात चांदणी चौकातही जोरदार आंदोलन केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये अहिल्या चौकात चक्काजाम केला. नगर-मनमाड रस्त्यावरही मेंढ्या आणून वाहतूक थांबवली. बारामतीतल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी दुकांनांची तोडफोड केल्यानं बारामतीत अघोषित बंद आहे. दरम्यान वर्धा जिल्ह्यात नागपूर-यवतमाळ महामार्गावर पवनार इथं आंदोलकांनी रास्ता रोको केला.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2014 10:19 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close