राज्यात 123 तालुक्यांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर

राज्यात 123 तालुक्यांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर

 • Share this:

drought_in_maharashtra13 ऑगस्ट : मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे अखेर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची दुर्देवी वेळ आली आहे. सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या 123 तालुक्यांत टंचाईसदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली आहे.  अडीच तासांच्या खडाजंगी चर्चेनंतर राज्य मंत्रिमंडळाने अखेर दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार आहे. यासोबतच शेती पंपांच्या वीजबिलात 33 टक्के सवलत दिली जाणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पाऊस झालाय त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय. या बैठकीत शेतकर्‍यांना आर्थिक मदतीबरोबरच जिथे भीषण पाणी टंचाई आहे तिथे युद्धपातळीवर मदत पोचवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.

आधी मान्सून लांबला आणि आता राज्यातल्या निम्याहून अधिक भागात पावसानं ओढ दिलीय. त्यामुळे दुबार किंवा तिबार पेरणी करूनही उभी पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा दृष्काळसदृश्य परिस्थितीचा आज राज्य मंत्रिमंडळात आढावा घेण्यात आला. पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवल्याने दुष्काळाचं सावट पसरलंय. गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाची सरासरी केवळ 20.47 टक्के आहे. सर्वात कमी सरासरी परभणी,हिंगोली आणि नांदेड मध्ये 17 टक्के आहे. मराठवाड्यातील सर्वच बांधारे,धरण आणि विहिरी कोरड्या आहेत.

पावसाची तूट

 • हिंगोलीत 72 टक्के तूट
 • नांदेडमध्ये 68 टक्के तूट
 • परभणी 67 टक्के, तूट
 •  जालना जिल्ह्यातील 60 टक्के तूट

पावसाची सरासरी

 • जालना 17.59 टक्के
 • औरंगाबाद 21.01 टक्के
 • परभणी 17.13 टक्के
 • हिंगोली 17.76 टक्के
 • नांदेड 17.09 टक्के
 • बीड 21.58 टक्के
 • लातूर 24.44 टक्के
 • उस्मानाबाद 22.38 टक्के

Follow @ibnlokmattv

First published: August 13, 2014, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading