दिल्ली डेअर डेविल्स विजयी : 7 विकेट्स राखून कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव

11 मे,आयपीएलमध्ये दिल्लीनं विजयाची घौडदौड कायम ठेवत कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट राखून पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या नाईट रायडर्सला 8 विकेट गमावत केवळ 123 रन्स करता आले. आशिष नेहरानं कॅप्टन मॅक्युलम आणि तिसर्‍या नंबरवर आलेल्या हॉज मॅचला पहिल्याच ओव्हरमध्ये पॅव्हेलिअनमध्ये परतवलं तर दुसर्‍या ओव्हरमध्ये नानेसनं वीकला शून्यावर आऊट करत पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. सौरवनं 44 तर आगरकरनं 39 रन्स करत टीमला 123 रन्सचा आकडा पार करुन दिला. नाईट रायडर्सनं ठेवलेलं 123 रन्सचं माफक आव्हान पार करताना दिल्लीनं 3 विकेट गमावल्या पण एबी डिव्हिलिअर्सनं नॉटआऊट 40 रन्स तर वॉर्नरनं 36 रन्स करत शानदार खेळीच्या जोरावर विजय मिळवला. नाईट रायडर्सवरच्या या विजयानं दिल्लीनं स्पर्धेतील आपल्या सातव्या विजयाची नोंद करुन सेमीफायनलमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलंय. नाईट रायडर्सचा मात्र हा सलग 8वा पराभव ठरला आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 11, 2009 11:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2009 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...