इंग्लंडमध्ये कार अपघातातून गावसकर बचावले

इंग्लंडमध्ये कार अपघातातून गावसकर बचावले

  • Share this:

gavaskar12 ऑगस्ट : इंग्लंडमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर अपघातातून थोडक्यात बचावले आहे. इंग्लंडमध्ये मँचेस्टरहून लंडनला जात असताना त्यांच्या कारला समोरून येणार्‍या एका कारनं धडक दिली.

त्या कारमध्ये इतर दोघेही होते, मात्र सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. गावसकर यांच्यासोबत क्रिकेट समालोचक मार्क निकोलस गाडीत होते. आज सकाळी गावसकर मँचेस्टरहून लंडनला कारने जात होते.

गावसकर हे कारच्या मागील सीटवर बसलेले होते. काही अंतर पार केल्यानंतर समोरुन येणार्‍या एका भरधाव कारने अचानक जोराची धडक मारली. या अपघातात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

मात्र कारचं नुकसान झालं. देवाचा मी आभारी आहे की या अपघातातून बचावलो अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. दुर्घटनेच्या वेळी जोरदार पाऊस सुरू होता. कारचा स्पीडही जास्त होता.पावसामुळे ड्रायव्हरला अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात गावसकर सुखरूप असून दुसर्‍या कारने आपल्या निर्धारित ठिकाणी पोहचले आहे. इंग्लंडमध्ये सध्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामने सुरू आहे. या सामन्यांसाठी गावसकर समालोचकाची भूमिका बजावत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2014 05:54 PM IST

ताज्या बातम्या