सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रॉबिन विल्यम्सचं निधन

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रॉबिन विल्यम्सचं निधन

  • Share this:

Robin williams

12  ऑगस्ट : ऑस्कर पुरस्कार विजेते आणि हॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेते रॉबिन विल्यम्स यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. कॅलिफोर्निया पोलिसांना नैराश्येपोटी आत्महत्येचा संशय आहे. विल्यम्स 63 वर्षांचे होते.

विल्यम्स यांच्या घरात मृत्यूपूर्वपत्र आढळल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. कॅलिफोर्नियातील टिबुरॉन येथे राहत असलेल्या विल्यम्स यांच्या घरातून पोलिसांना फोन आला होता, पण ते काहीच बोलले नाही. त्यानंतर पोलीस अधिकारी घरी पोहोचल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे, पण ते तपासानंतरच स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.

विल्यम्स आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. स्टँण्ड अप कॉमेडियन अशीही त्यांची ओळख होती. त्यांना 3 वेळा ऑस्कर ऍवॉर्ड मिळाला होता. 'द फिशर किंग', 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम', 'जुमांजी', 'जॅक, डेड पोएट्स सोसायटी', 'पॉपॉय', 'नाईट ऍट द म्युझियम', 'अलादिन', 'मिसेस डाऊट फायर' अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका प्रसिद्ध होत्या. 1997 मध्ये 'गुड विल हंटिंग' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर ऍवॉर्ड्स मिळाला होता. ऑस्करसोबतच त्यांना चार गोल्डन ग्लोब तर पाच ग्रॅमी ऍवॉर्ड्स मिळाले होते.

Follow @ibnlokmattv

First published: August 12, 2014, 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading