जोगेश्वरीतल्या गोविंदाचा सरावानंतर मृत्यू

 जोगेश्वरीतल्या गोविंदाचा सरावानंतर मृत्यू

  • Share this:

Dahi handi

11  ऑगस्ट : नवी मुंबईत सानपाड्यातल्या 14 वर्षाच्या किरण तळेकरी या गोविंदाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच जोगेश्वरीतील बेहराम नगरमधल्या आणखीण एका गोविंदाचा सरावादरम्यान मृत्यू झाला आहे. ओम साई गोविंदा पथकातल ह्रषिकेश पाटील हा 19 वर्षांच्या गोविंदाचा शनिवारी मध्यरात्री सरावादरम्यान अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा गोविंदा मंडळांमध्ये खळबळ उडाली आहे.

दहीहंडीच्या सरावानंतर ह्रषिकेश आपल्या मित्राशी गप्पा मारत असताना तो अचानक चक्कर येऊन खाली पडला त्यानंतर त्याला कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर ह्रषिकेशच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. या घटनेची नोंद घेतली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Follow @ibnlokmattv

First published: August 11, 2014, 10:30 AM IST

ताज्या बातम्या