मुंबईतही इबोलाचा संशयित?

मुंबईतही इबोलाचा संशयित?

  • Share this:

ebola virus

11 ऑगस्ट : पश्चिम आफ्रिकेत मृत्यूचं थैमान घालणार्‍या इबोला रोगाचा संशयित हा मुंबईच्या वेशीवर असलेल्या वसईत आढळला आहे. हा रुग्ण स्वत:हून केंद्रीय आरोग्य विभागाच्या संपर्कात आला आहे. 31 वर्षांचा हा मुळचा भारतीय, मात्र तो कामानिमित्त नायजेरियात गेला होता. नायजेरियात इबोला या व्हायरसने थैमान घातल्यावर तो घाबरून नायजेरीयावरून पुन्हा भारतात आला. त्याला घरी आल्यावर सतत ताप आणि अंगदुखीचा त्रास सुरू झाला. त्याला इबोला व्हायरसच्या रोगाची लक्षणं माहीत होती. त्यामुळे त्याने तात्काळ ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय दिल्ली येथे कळवली. तेथून हालचालींना वेग आला आणि महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने या तरुणाला तात्काळ आज दुपारी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सर डी.एम.पेटीट या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

या रुग्णाला इबोलाची लागण झाल्याचा संशय असून आज त्याला त्याच्या घरीच निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. त्याला बाहेर कुठेही फिरण्याची मुभा नाही. या रुग्णाला आरामाची गरज असल्याने आणि चांगलं जेवण मिळावं यासाठी त्याला घरीच ठेवण्यात आलंय. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम दररोज त्याची तपसणी करणार आहे. इबोलाच्या निदानाचा काळ 21 दिवसाचा असतो. या रुग्णाला येऊन 13 दिवस झाले आहेत. त्यामुळे अजून सात दिवस निगराणीखाली ठेवनार आहेत. त्यानंतरच त्याला इबोला आहे की नाही, याबद्दल नेमकी माहिती मिळेल असं वसई विरार महापालिकेच्या आरोग्य अधिकारी अनुपमा राणे यांनी सांगितलं.

दरम्यान, काल असाच एक संशयित चेन्नईतल्या राजीव गांधी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. मात्र त्याच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर त्या रूग्णाला इबोला व्हायरसची लागण झालं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या जगभरात धुमाकूळ घातलेल्या इबोला व्हायरसने आतापर्यंत आफ्रिकेतील जवळपास 1000 जणांचा बळी घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(डब्लूएचओ)ने पश्चिम आफ्रिकेत 'इबोला' व्हायरस पसरल्याने जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे या लोकांमार्फत हे व्हायरस भारतात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या व्हायरसचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतात 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2014 09:45 AM IST

ताज्या बातम्या