लाज गेली मॅचही गेली, चौथ्या टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव

लाज गेली मॅचही गेली, चौथ्या टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव

  • Share this:

englad win09 ऑगस्ट : भारताचे शेर पुन्हा एकदा परदेशात ढेर झाले आहे.मँचेस्टरमध्ये चौथ्या टेस्टमध्ये भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडने भारतावर 1 डाव आणि 54 रन्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. 5 टेस्ट मॅचच्या या सिरीजमध्ये इंग्लडने 2-1 ने अशी आघाडी घेतलीय. विशेष म्हणजे इंग्लंडने टेस्टच्या तिसर्‍याच दिवशी भारतावर दणदणीत विजय मिळवला.

दुसर्‍या दिवशी भारताची इनिंग 161 रन्सवरच आटोपली. मोईन अलीच्या स्पिनसमोर भारताच्या बॅटसमननी लोटांगणच घातलं. मोईन अलीने भारताच्या 4 बॅटसमनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव 367 रन्सवर आटोपला आणि इंग्लंडने भारतावर पहिल्या इनिंगमध्ये 215 रन्सची आघाडी घेतली होती. तिसर्‍या दिवशी धावांचा पाठलाग करता करता भारताची दुसरी इनिंग 161 वरच कोसळली आणि चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडने पराभवाचा वचपा काढत भारताचा लाजिरवाणा पराभव केला.

Follow @ibnlokmattv

First Published: Aug 9, 2014 11:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading