सोनेरी सदरा घालू कसा, नव्या गोल्डमॅनला टेन्शन !

सोनेरी सदरा घालू कसा, नव्या गोल्डमॅनला टेन्शन !

  • Share this:

panaj parakh09 ऑगस्ट : पुण्यात दत्ता फुगे या गोल्डमॅननंतर नाशिकमध्ये पंकज पारेख हे नवे गोल्डमॅन म्हणून उदयास आले आहे. पंकज पारेख यांनीही फुगे सारखा सोन्याचा शर्ट तयार केला आहे. पण हे गोल्डमॅन राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक निघाले.

त्यामुळे पक्षात असतांना असलं सोन्याचं ओंगाळवाणं प्रदर्शन करू नये अशी तंबी देण्यात आली. पण इतके पैसे खर्च करुन सोन्याचा शर्ट तयार केला आणि तो घालायचा नाही याचा मोह गोल्डमॅनला आवरेना. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात साधा शर्ट आणि नेत्यांनी पाठ फिरवताच सोन्याचा शर्ट घालायचा असा फंडा पारेख यांनी हाती घेतलाय.

येवला येथील रहिवासी असलेले पंकज सुभाष पारेख व्यवसायाने कापड व्यापारी आहे. लहानणापासून त्यांना सोन्याच्या दागिन्यांची हौस होती. त्यामुळे पारेख यांनी नाशिकच्या बाफणा ज्वेलर्सकडून तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च करून 4 किलो वजनाचा सोन्याचा शर्ट तयार

केलाय.

दुबई येथील एका कारागिराने या शर्टचे डिझाईन तयार केली. जून महिन्यापासून या शर्टवर 19 कारागीर काम करत होते. हा शर्ट तयार करण्यासाठी 50 दिवस लागले. सोन्याच्या फ्रेमचा चष्मा, सोन्याचे घड्याळ यासह पंकज यांच्याकडे हातात कडे, गळ्यात गोफ, अंगठी असे अंगावर असे दीड किलो सोन्याचे दागिने आहेत. पारेख यांनी सोन्याचा सदरा तयार करुन एकच खळबळ उडवून दिली.

दुष्काळी येवल्यात सोन्याची झळाळी अशी टीका आता त्यांच्यावर होतेय. त्यामुळे राष्ट्रवादीने पारेख यांना तंबी दिली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तर कार्यक्रमात सोन्याचा शर्ट घातला तर येणार नाही अशी अट घातली. पारेख यांनी ही अट मान्य केली. भुजबळ कार्यक्रमाला हजर झाले पण भुजबळांची पाठ वळताच पारेख यांनी परत सोन्याचा शर्ट अंगावर चढवला. पारेख सध्या सुरक्षारक्षकांचा ताफा घेऊ गावभर सोन्याचा शर्ट घालून फिरत आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 9, 2014, 6:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading