नवी मुंबईत बालगोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

नवी मुंबईत बालगोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

  • Share this:

kiran_talekar09 ऑगस्ट : दहीहंडीत बाल गोविंदा असणारच असा हट्ट धरणार्‍या गोविंदा पथकामुळे एका चिमुरड्याला जीव गमावावा लागला. नवी मुंबईत सानपाड्यामध्ये दहीहंडीचा सराव करताना एका बाल गोविंदाचा मृत्यू झालाय.

किरण तळेकरी असं बाल गोविंदाचं नाव असून तो अवघ्या 14 वर्षाचा होता. चार दिवसांपूर्वी किरण सरावादरम्यान पाचव्या थरावरून खाली पडला. त्याच्या छातीला दुखापत झाली होती. काल शुक्रवारी किरणला अचानक उलट्या होऊ लागल्यामुळे नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पण या उपचारांदरम्यान आज सकाळी 11 वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजून कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नाहीय पण किरणच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केलाय.

Follow @ibnlokmattv

First published: August 9, 2014, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading