मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली डेअरडेविल्सशी

8 मेआयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली डेअरडेविल्सशी आहे. दिल्लीचं पारडं मुंबई टीमपेक्षा जड आहे. दिल्ली डेअरडेविल्स टीमसाठी आज सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसुर्या या दोन दिग्गजांना लवकर आऊट करणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसुर्या ही ओपनिंग जोडी कुठल्याही टीमसाठी घातक ठरू शकते. पण डेक्कन चार्जर्सविरूद्ध हे दोघंही लवकर आऊट झाले होते आणि दिल्लीला याची पुनरावृत्ती करायची आहे.पॉईंट्स टेबल बघता मुंबईपेक्षा दिल्लीची टीम सरस दिसत आहे. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये तरी ते वरचढ आहेत. दिल्लीचा महत्त्वाचा प्लेअर विरेंद्र सेहवाग आणि मुंबई चा महत्त्वाचा बॉलर झहीर खान दुखापतीमुळे मॅचमध्ये खेळू शकणार नाहीत. आयपीएलच्या दुसर्‍या सिझनमध्ये दोन्ही टीम पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. गेल्या वर्षी दोन्ही टीमने एकमेकांविरूद्ध एकेक मॅच जिंकली होती. त्यामुळे आज होणार्‍या मॅचच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 8, 2009 04:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2009 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...