अमेरिकेने इराकवर सुरू केले हवाई हल्ले

अमेरिकेने इराकवर सुरू केले हवाई हल्ले

  • Share this:

usa attack iraq08 ऑगस्ट : धुमसत्या इराकमध्ये अखेर अमेरिकेनं उडी घेतलीय. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलेल्या आदेशानुसार आज अमेरिकेनं हवाई दलाने आयसीसच्या अतिरेक्यांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.

आयसीसच्या शस्त्रागारावर विमानांनी आज पहिला हल्ला चढवलाय. या हल्ल्याला पेंटॅगॉनकडून पुष्टी मिळालीय. इराकमधील कुर्दिस्तानमधल्या आयसीसच्या शस्त्रसाठ्यावर हा पहिला हल्ला चढवण्यात आलाय. पण, या हल्ल्यात आतापर्यंत किती अतिरेकी मारले गेले याबाबत अजून कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.

इराकमधील नागरिक आणि अमेरिकन नागरिक यांना या अतिरेक्यांचा धोका आहे. त्यामुळे या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी हवाई हल्ला करणार असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं होतं. दहशतवादी अर्बिल कर्दिस्तानच्या दिशेने कूच करत असल्याने तिथल्या अमेरिकी नागरिकांच्या बचावासाठी हल्ल्याची गरज असल्याचंही ओबामा यांनी स्पष्ट केलं होतं.

ओबामांनी आपली भूमिका स्पष्ट करुन एकाप्रकारे हवाई दलाला कूच करण्याचे आदेशच दिले होते. त्यानुसार अमेरिकनं दलाने हे हल्ले सुरू केले आहे. इराकमधील कुर्दिस्तानमधल्या आयसीसच्या शस्त्रसाठ्यावर हा पहिला हल्ला चढवण्यात आलाय. पण, या हल्ल्यात आतापर्यंत किती अतिरेकी मारले गेले याबाबत अजून कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.

इराकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आयएसआयएस ही दहशतवादी संघटना उत्तर इराकच्या कर्दिस्तानच्या राजधानीपर्यंत पोहचली आहे. यामुळे लाखो ख्रिश्चन नागरिक बेघर झाले आहेत. सोबतच याझिदी जमातीचे जवळपास 50 हजार लोकंही अडकलेले आहेत. यासगळ्यांना अन्न-पाणी मिळायलाही अडचण होतेय. 2011 च्या अखेरीस अमेरिकेने आपलं इराकमध्ये असलेलं सैन्य परत बोलावलं होतं. त्यानंतर 3 वर्षांतला अमेरिकेचा हा पहिला हल्ला आहे.

अमेरिकेचे नागरिक आणि हजारो निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात आलेले असताना अमेरिका कारवाई करणारच असं ओबामा यांनी म्हटलंय. मात्र, गेल्या वेळप्रमाणे अमेरिकी सैन्य प्रत्यक्ष इराकी जमिनीवर उतरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

First published: August 8, 2014, 9:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading