मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे

  • Share this:

mard doctor408 ऑगस्ट : मार्डच्या डॉक्टरांनी आपला निर्धारित संप मागे घेतला आहे. मार्ड संघटनेचे पदाधिकारी आणि वैद्यकीय मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक झाली. या बैठकीत 90 टक्के मागण्यांना मान्यता देण्यात आली असून 10 टक्के मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू असं आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. त्यानंतर संघटनेनं आपण संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी उद्या(शनिवार)पासून संपावर जाण्याची घोषणा मार्डच्या डॉक्टर्सनी केली होती. या संपात राज्यभरातल्या 14 सरकारी कॉलेज आणि 3 कॉर्पोरेशन हॉस्पिटल्सचे मार्डचे 4000 डॉक्टर्स उद्यापासून सुरू होणार्‍या या संपात सहभागी होणार होते. मात्र रोगा अगोदरच इलाज झाल्यामुळे संप टळलाय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2014 11:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...