Elec-widget

डॉक्टरांच्या संपामुळे 234 रुग्णांचा मृत्यू

डॉक्टरांच्या संपामुळे 234 रुग्णांचा मृत्यू

  • Share this:

doctor08 ऑगस्ट : आपल्या मागण्यांसाठी रुग्णांना वेठीस धरुन आंदोलनाचे हत्यार उपसणारे डॉक्टर 234 रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांच्या संपकाळात 234 रुग्ण दगावल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली.

हे मृत्यू कोणत्या कारणामुळे झालेत याची त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने यावेळी सरकारला दिले आहे. संपकाळात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकंाना नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलीय.

अगोदर हा मृतांचा आकडा 80 होता असं सांगण्यात आलं पण राज्यभरातील हॉस्पिटलची माहिती घेतल्यानंतर खुद्ध राज्य सरकारनेच ही माहिती सादर केली. यासंदर्भात कोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर ही समिती स्थापन करण्यात आली असून त्याचा अहवाल कोर्टात सादर केला जाईल असं सरकारतर्फे कोर्टात सांगण्यात आलं.

दरम्यान, संपावर गेलेल्या सहाशे आयुर्वेदिक डॉक्टरांना बडतर्फ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णय मुंबई हायकोर्टाने स्थगित केलाय. या डॉक्टरांना तात्काळ रुजू होण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2014 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...