'पहिले पाढे पंचावन', टीम इंडिया 152 वर ऑलआऊट

'पहिले पाढे पंचावन', टीम इंडिया 152 वर ऑलआऊट

  • Share this:

team_india_england07 ऑगस्ट : ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानावर धडाकेबाज कामगिरी करणारी टीम इंडिया तिसर्‍या टेस्टमध्ये पराभूत झाली. मात्र आज चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने पुन्हा 'पाढे पंचावन' सुरू केले आहे.  भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाची दाणादाण उडाली. भारताची पहिली इनिंग फक्त 152 रन्समध्येच गुंडाळली गेली. टॉस जिंकून भारताने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

पण भारताचे सर्व बॅट्समन आज सपशेल फ्लॉप ठरले. तब्बल सहा बॅट्समनना तर भोपळाही फोडता आला नाही. आणि त्यांनी पॅव्हेलियनचा रस्ता धरला.अजिंक्य रहाणेनं 24, अश्विननं 40 तर कॅप्टन धोणीनं 71 रन्स करत इनिंग सांभाळण्याचा प्रयत्न केला खरा पण ते अपयशी ठरले. लंच टाईमपर्यंत टीम इंडियानं 63 रन्सवर 5 विकेट गमावल्या आहेत. टॉस जिंकून टीम इंडियानं पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

पण कॅप्टन धोणीच्या या निर्णयाचा भारतीय बॅट्समन अजिबात फायदा उचलू शकले नाहीत. शिखर धवनच्या ऐवजी टीममध्ये संधी मिळालेला गौतम गंभीर फक्त 4 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. तर या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करणारा भारताचा ओपनर मुरली विजय तर भोपळाही फोडू शकला नाही. भारतासाठी हे दोन धक्के तर होते. पण टीम इंडियाला दणका बसला तो चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीही चक्क खातं न उघडता शून्यावर आऊट झाले. 8 रन्सवर भारताला तब्बल 4 विकेट गमवाव्या लागल्या. तर इनिंग सांभाळण्याचा प्रयत्न करणारा अजिंक्य रहाणेही 24 रन्सवर आऊट झाला. इंग्लंडतर्फे तुफान फॉर्मात असलेल्या जेम्स अँडरसननं आणि स्टुअर्ट ब्रॉडनं प्रत्येकी 2 तर ख्रिस जॉर्डननं 1 विकेट घेतली.

Follow @ibnlokmattv

First published: August 7, 2014, 7:55 PM IST

ताज्या बातम्या