S M L

संशयाचं भूत, 'त्या' दोघांना विवस्त्र करुन अमानुष मारहाण

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2014 05:09 PM IST

crime07 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात एक महिला आणि एका पुरूषाला विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पाचोर्‍यात ही घटना घडली. हे प्रकरण एवढ्यावर न थांबता त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो काढण्यात आले. हल्लेखोरांमध्ये खडकदेवळा या गावच्या सरपंचाचा समावेश असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे राहणारा प्रवीण पाटील (28) याचे लग्न होऊन त्याच्या पत्नीशी न पटल्याने त्याने न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे . तर पाचोरा येथील महिलेने (पूनम पाटील ) आपल्या पती विरुद्ध न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे . खावटी पोटी 3 लाख रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते.

पूनम वारंवार पैशांची मागणी सासरच्यांकडे करत होती आणि या कामी फूस लावण्याचे काम प्रवीण हा करत आहे असा संशय त्यांना होता. या गोष्टीचा राग पूनमच्या सासरच्या मंडळींना आला आणि या वरूनच बुधवारी रात्री प्रवीण पाटील याला 10 ते 20 लोकांनी प्रचंड मारहाण करत चारचाकी गाडीतून उचलून पूनमच्या घरी नेले. तेथे परत दोघांना मारहाण करून त्यांचे कपडे काढत त्या अवस्थेतील फोटो ही काढण्यात आले.


मारहाण करणार्‍यांमध्ये 6 महिला काही पुरुष आणी खडकदेवळा गावचे सरपंच असल्याचा आरोप पूनम आणी प्रवीण पाटील यांनी केला आहे . या प्रकरणी पोलिसांना हाताशी घेऊन मारेकर्‍यांनी हे कृत्य केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून लवकरच या प्रकरणी कारवाई करण्यात येईल असं पाचोरा येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायधनी यांनी सांगितलं.

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2014 04:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close