ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर काळाच्या पडद्याआड

  • Share this:

Smita_Talwalkar_Web copy 06  ऑगस्ट : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर आज अनंतात विलिन झाल्या. बुधवारी दुपारी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप द्यायला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार पोहोचले होते. चौकट राजा, कळत नकळत , तू तिथे मी , सवत माझी लाडकी अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री-निर्माती-दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांचं मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून स्मिता तळवलकर या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या स्मिता तळवलकर यांनी मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टेलिव्हिजनवरच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणूनही स्मिता तळवलकरांनी आपली ओळख निर्माण केली. जवळपास 17 वर्षं त्यांनी दूरदर्शनवर काम केलं. 1986 मध्ये त्यांनी 'गडबड घोटाळा' आणि 'तू सौभाग्यवती हो' या चित्रपटांतून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. 1989 मध्ये त्यांनी 'अस्मिता चित्र' या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती- दिग्दर्शन केले. 'चौकट राजा', 'कळत नकळत', 'सवत माझी लाडकी', 'तू तिथे मी', 'सातच्या आत घरात' हे चित्रपट तर 'अवंतिका', 'ऊनपाऊस', 'उंच माझा झोका', 'पेशवाई' या मालिका विशेष गाजल्या. 'कळत नकळत' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

  • प्रतिक्रिया :

- मृणाल कुलकर्णी : स्मिता तळवलकर यांच्याकडून खूप शिकायला मिळालं.

- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : स्मिता तळवलकर यांच्याबद्दल ऐकून दु:ख झालं. आपण एक हरहुन्नरी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका गमावलीय, त्यांना आदरांजली.

  • स्मिता तळवलकर यांचे चित्रपट

- तू सौभाग्यवती हो (1986)

- गडबड घोटाळा (1986)

- कळत नकळत (1989)

- चौकट राजा (1991)

- सवत माझी लाडकी (1993)

- शिवरायाची सून ताराराणी (भूमिका : येसूबाई, 1993)

- तू तिथे मी (1998)

- सातच्या आत घरात (2004)

- आनंदाचे झाड (2006)

- चेकमेट (2008)

- टोपी घाला रे (2010)

- अडगुळ मडगुळ (2011)

- एक होती वाडी (2011)

- जन्म (2011)

- श्यामचे वडील (2012)

- या गोल गोल डब्यातला (2012)

- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (2013)

  • मालिका

- घरकुल

- पेशवाई

- अवंतिका

- ऊनपाऊस

- कथा एक आनंदीची

- अर्धांगिनी

- सुवासिनी

- उंच माझा झोका

  • नाटकं

- कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या (भूमिका : जनाबाई)

  • स्मिता तळवलकर यांना मिळालेले पुरस्कार

- राष्ट्रीय पुरस्कार - कळत नकळत (1989)

- राष्ट्रीय पुरस्कार - तू तिथे मी (1998)

- महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार - सवत माझी लाडकी (1992)

- महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा पुरस्कार - तू तिथे मी (1998)

- महाराष्ट्र शासनाचा व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार (2010)

Follow @ibnlokmattv

´Ö¸üÖšüß ×ÃÖ®ÖêÃÖé™üߟÖᯙ ¯ÖÏ×ÃÖ¨ü †×³Ö®Öê¡Öß, ×®Ö´ÖÖÔŸÖß †Ö×ÞÖ ×¦üݦüÙ¿ÖÛúÖ ×ô֟ÖÖ ŸÖôû¾Ö»ÖÛú¸ü †ÖäÖ †®ÖÓŸÖÖŸÖ ×¾Ö×»Ö®Ö ðÖÖ»ñÖÖ. ²Öã¬Ö¾ÖÖ¸üß ¦ãü¯ÖÖ¸üß ¦üÖ¦ü¸ü ñÖê£Öß»Ö Ã´Ö¿ÖÖ®Ö³Öæ´ÖßŸÖ ŸñÖÖÓáñÖÖ ¯ÖÖÙ£Ö¾ÖÖ¾Ö¸ü †ÓŸñÖÃÖÓÃÛúÖ¸ü Ûú¸üÞñÖÖŸÖ †Ö»Öê. ŸñÖÖÓ®ÖÖ †ÜÖê¸üáÖÖ ×®Ö¸üÖê¯Ö ªÖñÖ»ÖÖ ´Ö¸üÖšüß ×ÃÖ®ÖêÃÖé™üߟÖᯙ †®ÖêÛú Ûú»ÖÖÛúÖ¸ü ¯ÖÖêÆüÖêáÖ»Öê ÆüÖêŸÖê

First published: August 6, 2014, 11:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading