कॉमनवेल्थमधल्या पुरस्कार विजेत्यांच्या बक्षिसात भरघोस वाढ

कॉमनवेल्थमधल्या पुरस्कार विजेत्यांच्या बक्षिसात भरघोस वाढ

  • Share this:

rahi_sarnobat_kor-1406439093

 05 ऑगस्ट : ग्लासगो इथे झालेल्या कॉमनवेल्थमधल्या पुरस्कार विजेत्यांच्या बक्षिसाच्या रकमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. गोल्ड मेडल विजेत्यांना 10 लाखांऐवजी 50 लाख, सिल्व्हर मेडल विजेत्यांना 7 लाखांऐवजी 30 लाख तर ब्राँझ मेडल विजेत्यांना 5 लाखांऐवजी 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत. प्रशिक्षकांना मिळणार्‍या बक्षिसाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. गोल्ड मेडल विजेत्यांच्या प्रशिक्षकांना आता 2.5 ऐवजी 12.5 लाख देण्यात येतील. सिल्व्हर मेडल विजेत्यांच्या प्रशिक्षकांना 7.5 लाख तर ब्राँझ मेडल विजेत्यांच्या प्रशिक्षकांना 5 लाख रुपये देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 5, 2014, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading