राजस्थान रॉयल्सची लढत बंगलोर रॉयल चॅलेंजर्सशी तर चेन्नई सुपर किंग्जची पंजाब किंग्ज एलेव्हनशी

7 मे आयपीएलमध्ये आज पहिली मॅच राजस्थान रॉयल्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स यांच्यामध्ये होणार आहे. गेल्या वर्षी शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्सने अनपेक्षित कामगिरी करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. दुसर्‍या मोसमातही राजस्थानने स्पर्धेतला सर्वाधिक स्कोअर ठोकलाय. त्यामुळे आज बंगलोरविरूद्धच्या मॅचमध्ये त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलाय. दुसरीकडे विजय माल्या यांनी विकत घेतलेल्या बंगलोर रॉयल्समध्ये कुंबंळेने आत्तापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केलीय. त्यातच गेल्या वेळी राजस्थान रॉयल्सविरूद्ध झालेल्या आमने सामने कुंबळेने बॅट्समनच्या नाकी नऊ आणले होते. त्या मॅचमध्ये त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे आजच्या मॅचमध्येही कुंबळेच्या फिरकीसमोर राजस्थानचे बॅट्समन कसे उभे राहतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे राजस्थान आणि बंगलोर मॅचमध्ये राजस्थानचं पारडं जड आहे तर एकीकडे कुंबळेवर बंगलोरची भिस्त आहे. या मॅचमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. आयपीएलमध्ये आज दुसरी मॅच चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज एलेव्हनमध्ये आहे. गेल्या मॅचमध्ये डेक्कन चार्जर्सचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्जने सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली होती. तर दुसरीकडे आपल्या शेवटच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर पंजाब किंग्ज एलेव्हनची पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. चेन्नई चांगली कामगिरी करत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल आहे. खेळाडूंची कामिगिरी पाहता मॅथ्यू हेडन विरूद्ध युसूफ अब्दुल्ला दोघंही या आयपीएलमध्ये एक वादळ म्हणून समोर आले आहेत. या दोघांमधलं युद्ध बघण्याची मेजवानीच आज क्रिकेट प्रेमींना मिळणार आहे. शेवटच्या तीन मॅचेसमध्ये आमचे खेळाडू चांगली कामगिरी करताहेत. शेवटच्या तीन मॅचेस आम्ही सहज जिंकलो आहोत. चेन्नई सुपर किंग्ज टीमचा सध्याचा फॉर्म चांगला आहे. त्यातच गोव्याचा स्पिनर शादाब जकातीची कामगिरी उल्लेखनीय झालीय. त्याने 8 ओव्हर्समध्ये आठ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या दुसर्‍या सिझनमध्ये चेन्नई आणि पंजाब पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध खेळणार आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये उत्सुकता असल्याचं चेन्नई सुपर किंग्जचा क्रिकेटर स्टीफन फ्लेमिंग याने सांगितलं.आता प्रश्न राहिला पंजाब किंग्ज एलेव्हनचा. राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या मॅचमध्ये पंजाबच्या बॉलर्सना चांगलाच फटका बसला होता. डर्बनला झालेल्या त्या मॅचमध्ये राजस्थानने 200च्या वर रन्स ठोकले होते. या मॅचबद्दल विचारलं असता आम्हाला सेमी फायनलमध्ये जायचं असेल तर पुढच्या सगळ्या मॅचेस जिंकणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आम्ही चांगला खेळ करू अशी आशा असल्याचं पंजाब किंग्ज एलेव्हनचा कॅप्टन युवराज सिंगने सांगितलं. असं असूनही 'माझा सपोर्ट तर टीमला आहेच पण आमचे फॅन्सही आम्हाला चांगला सपोर्ट करताहेत' हे सांगून पंजाब किंग्ज एलेव्हनची मालक प्रिती झिंटा मात्र टीमला प्रोत्साहन देतेय.आयपीएलच्या दुसर्‍या सिझनमधली चेन्नई विरूद्ध पंजाबची ही दुसरी मॅच आहे. एकंदरीत आता पंजाबसाठी या मॅचमध्ये विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2009 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading