अजिंठा लेण्यांवरचा डोंगरमाथा कोसळण्याची शक्यता

अजिंठा लेण्यांवरचा डोंगरमाथा कोसळण्याची शक्यता

  • Share this:

ajintha_caves04 ऑगस्ट : पुण्याजवळील माळीण गावच्या दुर्घटनेनंतर डोंगरपायथ्याशी असलेल्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांबद्दल भूगर्भशास्त्र विभागाने एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालानूसार अजिंठा लेण्यांवर असलेला डोंगरमाथा कोसळण्याची शक्यता आहे.

लेण्यांवर असलेल्या तीस जागांवरचा हा डोंगरमाथा धोकादायक परिस्थितीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पावसामुळे हा डोंगरमाथा खिळखिळा झालाय. तो कधीही खाली घसरू शकतो. अजिंठा लेण्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. या अहवालानंतर उपाययोजनांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

बुधवारी दिल्लीतील पुरातत्व विभागाच्या मुख्यालयात बैठक होणार आहे. अनेक संस्थांना उपाययोजनांबद्दल विचारणा करण्यात आलीय. लवकरात लवकर उपाययोजना झाली नाही तर अजिंठा लेण्यांमध्ये धोकादायक डोंगरमाथा कोसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलू नये असा आदेश दिल्ली मुख्यालयातून आल्यानं औरंगाबादेत अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2014 06:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading