'लवासा'तही 'माळीण' होऊ शकतं -पाटकर

'लवासा'तही 'माळीण' होऊ शकतं -पाटकर

  • Share this:

medha patakar04 ऑगस्ट : माळीण दुर्घटनेनंतर डोंगराच्या पायथ्याशी राहणार्‍या लोकांचं इतर स्थालंतरित करावं लागेलं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी डोंगरदर्‍यातून आदिवासींना हुसकवून अशा ठिकाणी लवासासारखे 26 प्रकल्प करायचा पवारांचा प्रयत्न आहे, असा टोला लगावला आहे.

तसंच पवारांची संकल्पानं असलेल्या लवासातही 20 गावं धोकादायक असल्यामुळे लवासाचंही माळीण होऊ शकतं, असा इशाराही मेधा पाटकर यांनी दिला.

मागील आठवड्यात शरद पवार यांनी माळीण दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना यापुढे अशी घटना टाळण्यासाठी डोंगरपायथ्याशी राहणार्‍या लोकांचं दुसरीकडे स्थालंतरित करावं असा सल्ला दिला होता.

Follow @ibnlokmattv

First published: August 4, 2014, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading