माळीण गाव दुर्घटनेत मृतांचा आकडा 82 वर

माळीण गाव दुर्घटनेत मृतांचा आकडा 82 वर

  • Share this:

1augest_malin_pune (14)02 ऑगस्ट : पुण्याजवळ आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 82 वर पोहचली आहे. माळीण गावावर डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेला चार दिवस झाले आहेत.

44 घरं या ढिगार्‍याखाली गाडली गेली होती. हे ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढतोय. या दुर्घटनेत अनेकांनी आपल्या नातेवाईकांना गमावलंय. आपल्या हरवलेल्या नातेवाईकांचा ते शोध घेतायत आणि या ढिगारा उपसण्याच्या कामाकडे ते हताशपणे पाहत आहे.

माळीणमध्ये अधूनमधून पाऊस पडत असल्याने आणि चिखल झाल्यानं एनडीआरएफच्या जवानांना बचावकार्यासाठी झुंजावं लागतंय. त्यातच भयानक दुर्गंधीमुळे एनडीआरएफच्या जवानांचे हाल वाढलेय.

दुसरीकडे गेल्या चार दिवसांपासून ठप्प झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आलंय. 25 खांब आणि दीड किलोमीटरची वीजवाहिनी डोंगरकडा कोसळून जमिनदोस्त झाली होती. आता तात्पुरते सीएफएल बल्ब लावण्यात आले आहेत.

First published: August 2, 2014, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading