हे काय केलं आमिरने...

हे काय केलं आमिरने...

  • Share this:

amir_nude_poster01 ऑगस्ट : मिस्टर परफेक्टशनिस्ट अर्थात आमिर खान नेहमी काही तरी हटके प्रयोगाच्या शोधात असतो. आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेतून तो आपल्याला दिसला कधी तो टिव्ही शोमधून सामाजिक विषयांवर रडता ना दिसला तर कधी गंभीर विषयांवर नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मदतीचं आवाहन करणारा आमिर दिसला. त्याच्या या 'परफेक्टशनिस्ट'पणामुळे प्रेक्षकांनी/चाहत्यांनी त्याला डोक्यावरही घेतलं. पण त्याच्या आगामी पीके या सिनेमासाठी आमिरने तर कहरच केलाय.

आमिरने आपल्या सिनेमाचं पोस्टर आज ट्विटरवर प्रसिद्ध केलं पण हे जे काही पोस्टर प्रसिद्ध केलंय ते पाहुन अनेकांच्या भुवय्या उंचावल्याय तर काहींच्या तोंडातून नको ते उद्गार निघाले. या पोस्टरमध्ये आमिर नग्न झाला असून 'आसरा' म्हणून रेडिओ हातात घेतलाय. वाळवंटात एका रेल्वे ट्रॅकवर नग्न, अंगावर एक कपडा ही नाही आणि हातात रेडिओ घेऊन आमिर उभा... असं काहीसं हे पोस्टर आहे.

'थ्री इडियट्स'च्या यशानंतर आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांनी एकत्र येऊन हा सिनेमा साकारलाय त्यामुळे हा सिनेमा कसा असेल याची चर्चा अगोदरपासून सुरू आहे. पण त्यातच 'पोस्टर बॉम्ब' टाकून आमिरने धुमाकूळ घातलाय. ट्विटरवर पोस्टर प्रसिद्ध केल्यानंतर, मित्रांनो हे पोस्टर तुम्हाला कसं वाटलं. मला नक्की कळवा मी त्यासाठी खूप उत्सूक आहे असंही तो यावेळी म्हणाला.

ट्विटरवर एखाद्या बॉम्बसारखा हा पोस्टर फुटलाय. 'ट्विटर'वासीयांना यावर कॅमेंटचा पाऊस पाडलाय तर काहींनी याची खिल्ली उडवलीय. बॉलिवडूनगरीत आतापर्यंतचा सर्वात बोल्ड असं पोस्टर असल्याचं म्हटलं जातंय. या अगोदरही रणबीर कपूर याने सावरीया सिनेमात 'टॉवेल' सीनं देऊन लक्ष्य वेधलं होतं. त्यानंतर जॉन अब्राहमनेही 'दोस्ताना'मध्ये असाच काहीसा सीनं दिला होता. आता आमिरनेही हाच फंडा वापरत एक पाऊल पुढे टाकले आहे. आमिरच्या पीके सिनेमात अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह असून हा सिनेमा 19 डिसेंबरला रिलीज होतोय.

असं आहे संपूर्ण पोस्टर

 

pk_poster

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2014 04:49 PM IST

ताज्या बातम्या