'लॉर्डस्'चे शेर आज ढेर, इंग्लंडने साधली 1-1 ने बरोबरी

'लॉर्डस्'चे शेर आज ढेर, इंग्लंडने साधली 1-1 ने बरोबरी

  • Share this:

4england_win31 जुलै : लॉर्डसच्या मैदानावर शानदार विजय मिळवणारे भारतीय 'शेर' साऊथॅम्प्टनमध्ये ढेर झाले आहेत. साऊथॅम्प्टनमध्ये सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्टच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने भारताचा 266 रन्सनी धुव्वा उडवत विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने टेस्ट सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

आज पाचव्या दिवशी भारत 445 रन्सचं आव्हान घेऊन मैदानावर उतरली. अगोदरच चौथ्या दिवसाअखेर भारताने 112 रन्सवर 4 बॅट्समन गमावले होते. मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे महत्त्वाचे बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यामुळे भारताची मदार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर होती. मात्र इंग्लंडने भारताचे चमत्कारीक स्वप्न धुळीस मिळवत 178 रन्सवर भारतीय टीमला ऑलआऊट करुन विजय नोंदवलाय. भारताकडून सर्वाधिक 52 रन्स अजिंक्य रहाणेने बनवले.

पाचव्या दिवशी भारताची इनिंग सुरुवात खराब झाली. टीमला सावरण्यासाठी आलेल्या रोहित शर्माची विकेट पडली. रोहित आज एक रन्सही न करता चौथ्या दिवशी केलेल्या 6 रन्सवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कमान सांभाळली. पण धोनीही जास्तवेळी पिचवर टिकू शकला नाही.

जेम्स ऍडरसनने धोनीला आऊट करुन पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर रवींद्र जडेजा 12 रन्सवर आऊट झाला आणि भुवनेश्वर कुमारने खातं न उघडता आऊट झाला. पाचव्या दिवशी संपूर्ण टीम 178 रन्सवर आऊट झाली. इंग्लंडने दमदार विजय मिळवत सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे.

First published: July 31, 2014, 6:35 PM IST

ताज्या बातम्या