News18 Lokmat

दरड हटवली, मुंबई-नाशिक मार्ग पूर्ववत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2014 09:58 PM IST

दरड हटवली, मुंबई-नाशिक मार्ग पूर्ववत

igatpuridarad

30 जुलै : मुंबईहून नाशिकला जाणार्‍या कसारा इगतपुरी दरम्यान जुना मार्गावर दरड कोसळली होती. मात्र संध्याकाळी हा मार्ग पूर्ववत झाला आहे. रेल्वे वाहतूक मात्र जैसे थे आहे. कसारा-इगतपुरी दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणार्‍या गोदान एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, राजेंद्रनगर एक्स्प्रेस या गाड्या मनमाडहून पुणेमार्गे पाठवण्यात आल्यायत. तर भुसावळ-मुंबई पॅसेंजर मनमाडहून परत पाठवण्यात आली आणि मुंबई-भुसावळ पॅसेंजर कसार्‍यातून मुंबईला परत पाठवण्यात आलीय.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2014 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...