आघाडीच्या जागावाटपाचा चेंडू दिल्लीच्या कोर्टात !

आघाडीच्या जागावाटपाचा चेंडू दिल्लीच्या कोर्टात !

  • Share this:

ncp_meeting26 जुलै : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीने अगोदर आक्रमक भूमिका घेत 144 जागा द्या नाहीतर स्वबळावर लढा असा इशारा दिला होता. काँग्रेसनेही जशाच तसे उत्तर देत एक जागाही वाढून भेटणार नाही असं स्पष्ट भूमिका घेतली.

आता राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतलीय. आज मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाचा निर्णय हा दिल्लीतच घ्यावा असा प्रस्ताव मांडण्यात आलाय. आमच्या 144 जागेच्या मागणीवर काँग्रेसने विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसकडे केलीय.

तर बारामतीची जागा काँग्रेसमुळेच आली असा दावा माणिकराव ठाकरे यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीनंही प्रत्त्युत्तर दिलंय. नांदेड आणि हिंगोलीची जागाही राष्ट्रवादीमुळे आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय. राष्ट्रवादीनं काम केलंय त्यामुळेच बारामती आणि इतर ठिकाणी विजय झाल्याचं सुनील तटकरे यांनी सुनावलं.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीने 144 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय पण काँग्रेसने राष्ट्रवादीला 125 जागा देण्याची तयारी दाखवली आहे. आता 'गल्लीत गोंधळ' घालण्यापेक्षा दिल्ली दरबारी दोन्ही पक्षाचे हायकमांड सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी जागावाटपावर निर्णय घ्यावा अशी सावध भूमिका राष्ट्रवादीने घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2014 10:12 PM IST

ताज्या बातम्या