जय महाराष्ट्र !, गावकर्‍यांनी 'येळ्ळूर' फलक पुन्हा बसवला

जय महाराष्ट्र !, गावकर्‍यांनी 'येळ्ळूर' फलक पुन्हा बसवला

  • Share this:

belgaum yellur_news_26july 26 जुलै : बेळगावमध्ये पुन्हा कानडी वरवंटा चालला आणि सीमा भागातील अस्मितेचं प्रतिक समजल्या जाणार्‍या आणि गेल्या 56 वर्षांपासून बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावाच्या वेशीवर डौलान फडकणार्‍या महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक सरकारने पोलिसी दडपशाही आणि बळाचा वापर करून काढून टाकला होता. पण 'मोडेल पण वाकणार नाही' असा मराठी बाणा दाखवत सीमा भागातील मराठीजनांनी पुन्हा एकदा येळ्ळूर फलक उभारला आहे. गावकर्‍यांनी ज्याठिकाणी हा चौथरा तोडण्यात आला होता त्याच ठिकाणी फलक नव्याने उभारला आहे.

गेल्या 56 वर्षांपासून बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावच्या वेशीवर महाराष्ट्र राज्य येल्लूर हा फलक डौलान फडकत होता. मात्र पोटशूळ उठल्याने कानडी सरकारने सीमा भागातील मराठीचे अस्तित्वच संपण्याचा विडा उचलला आहे. गोकाकमधील भिमाप्पा गडाद या व्यक्तीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला सोमवारी 28 ऑगष्ट रोजी फलक हटवून न्यायालयासमोर म्हणणे मांडायचे होते.

पण शुक्रवारी 25 जुलै रोजीच सकाळी अचानक जिल्हा प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा फलक हटवला. या प्रकरणाचे पडसाद सीमालगतच्या भागात उमटले. कोल्हापूरमध्ये कर्नाटकच्या बसेसची तोडफोड करण्यात आली. महाराष्ट्र एकिकरण समितीने कडाडून विरोध केला असून आंदोलनाच्या पवित्रा हाती घेतला. शिवसेनेनंही याचा विरोध केलाय. चौथरा हटवल्यामुळे येळ्ळूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. मात्र आज गावकर्‍यांनी कर्नाटकी सरकारचा विरोध डावलून त्याच ठिकाणी नव्या फलक उभारला आहे.

First Published: Jul 26, 2014 04:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading