महाराष्ट्र सदनात सेनेचं आंदोलन योग्यच पण पद्धत चुकीची-भुजबळ

महाराष्ट्र सदनात सेनेचं आंदोलन योग्यच पण पद्धत चुकीची-भुजबळ

  • Share this:

BHUJBAL ON MUNDE326 जुलै : नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवसेनाच्या खासदारांनी राडा केला होता. त्यामागचा त्यांचा रोष योग्यच आहे, अशी पाठराखण आता राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलीय.

सदनाची देखरेख करण्यासाठी चमणकर या कंत्राटदाराला नेमलंय. पण सदनाचे आयुक्त बिपीन मलिक या चमणकरांना आतच येऊ देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला. आपण याची तक्रार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केलीय.

मात्र शिवसेना खासदारांनी मुस्लीम सुपरव्हायजरबरोबर जो प्रकार केला, तो निषेधार्थंच आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही, असंही ते पुढे म्हणाले.

शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनात निकृष्ट जेवण मिळत असल्यामुळे आंदोलन केलं होतं. सेनेचे खासदार राजन विचारे यांनी एका मुस्लीम सुपरव्हायजरला बळजबरीने चपाती तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. रमजानचा महिना असल्यामुळे त्याचा रोजा तुटला असा आरोप राजन यांच्यावर करण्यात आला. सेनेच्या या कृत्यामुळे चौफेर टीका होत आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांच्या खात्याच्या अंतर्गतचा महाराष्ट्र सदनाचं कामकाज पाहिलं गेलं. भुजबळांनीच आता सेनेच्या खासदारांची पाठराखण केली.

First published: July 26, 2014, 1:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading