25 जुलै : डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाच्या तपासासाठी करण्यात आलेल्या प्लँचेट प्रकरणाची चौकशी होणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. अतिरिक्त महासंचालकांच्या नेतृत्त्वाखाली ही चौकशी होणार आहे. प्लँचेट प्रकरणाच्या चौकशीचा आठवड्याभरात अहवाल येईल, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास जादूटोणा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहितीही आर. आर. पाटील यांनी दिली.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 11 महिने पूर्ण झाले आहेत. पण अजूनही त्यांच्या मारेकर्यांना अटक झालेली नाही. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्लँचेटचा वापर केल्याचा दावा पत्रकार आशिष खेतान यांनी केला आहे. या प्रकरणाच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ ही त्यांनी प्रसारमाध्यांमापुढे आणला. त्या व्हिडिओमध्ये उघडपणे माजी पोलीस कॉन्स्टेबल मनीष ठाकूर याच्यामार्फत दाभोलकरांचा मारेकरी कोण? हे शोधण्यासाठी प्लँचेट केल्याचं पोळ यांनी कबूल केलेलं आहे. इतकंच नाही तर मनीष ठाकूर दाभोलकरांच्या आत्म्याला बोलावून प्लँचेट करत असल्याचंही दिसतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना, आर.आर.पाटील यांनी आरोपांमध्ये तथ्य असल्यास कारवाई होणार करू सांगितलं आहे.
Follow @ibnlokmattv |