...मग महाराष्ट्र सदन कशाला ?, हॉटेल करुन टाका - उद्धव ठाकरे

...मग महाराष्ट्र सदन कशाला ?, हॉटेल करुन टाका - उद्धव ठाकरे

  • Share this:

udhav thakare on modi24 जुलै : दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात जे काही घडलं तसं काही नव्हतं पण महाराष्ट्र सदनात मराठी कलाकारांना परवानगी दिली जात नाही, नीट जेवण दिलं जात नाही मग महाराष्ट्रासाठी काय आहे ?, महाराष्ट्र सदनाचं लॉजिंग किंवा हॉटेल करुन टाका असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.

तसंच महाराष्ट्र सदनातल्या सेनेच्या आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.  नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

17 जुलै रोजी शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनात आंदोलन केलं होतं. त्यावेळी सेनेचे खासदार राजन विचारे यांनी कँटिनच्या मॅनेजर अर्शद यांच्या तोंडात चपाती कोंबण्याचा प्रयत्न केला. रोजा असतानाही चपाती खायला लावली होती. सेनेच्या या प्रकारामुळे दोन्ही सभागृहात गदारोळ झाला होता.

या कृत्यामुळे सेनेवर चौफेर टीका होत आहे. उद्धव यांनीही या प्रकरणावर सारवासारव करत आम्ही हिंदुत्ववादी असलो तरी असलं कृत्य करणार नाही असा खुलासा केला होता. तर राजन विचारे यांनी तो मॅनेजर मुस्लीम आहे हे मला माहिती नव्हतं म्हणून दिलगिरी व्यक्त केली.

पण आज उद्धव यांनी सेनेच्या आंदोलनावर ठाम भूमिका घेतलीय. आम्ही जे काही आंदोलन केलं होतं ते योग्यच होतं. महाराष्ट्र सदनात योग्य सोयी सुविधा नाही, निकृष्ट जेवण दिलं जातं मग त्याला महाराष्ट्र सदन नाव ठेवलंच कशाला त्याचं हॉटेल करुन टाका असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

First published: July 24, 2014, 5:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading