S M L

'इस्त्रायल युद्ध गुन्हेगार ठरू शकतो'

Samruddha Bhambure | Updated On: Jul 24, 2014 04:06 PM IST

'इस्त्रायल युद्ध गुन्हेगार ठरू शकतो'

24   जुलै :  गाझापट्टीत इस्रायलने केलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाची चौकशी संयुक्त राष्ट्राने सुरू केली आहे. त्यामुळे इस्त्रायल मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या गाझाबरोबर सुरू असलेल्या संघर्षात इस्त्रायल युद्ध गुन्हेगार ठरू शकतो, असं सयुंक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. नागरिकांच्या घरं नष्ट करणं आणि लहान मुलांना मारण यामुळे इस्त्रायल युद्ध गुन्हेगार ठरू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार विभागाच्या उच्चायुक्त नावी पिल्ले यांनी दिला आहे. आतापर्यंत या संघर्षात 643 पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. नागरी भागांना जाणूनबुजून लक्ष केल्याचा आरोप इस्त्रायलवर होत आहे.

भारताकडून निषेधयाच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारतानेही या हल्ल्याचा निषेध करत पॅलेस्टाईनने तयार केलेल्या मसुद्याच्या बाजूने मतदान दिलं आहे. ब्रिक्स आणि अरब देशांनीही मसुद्याच्या बाजूनेच मतदानं केलं आहे. फक्त अमेरिकेनेच ठरावाच्या विरोधात मतदान केल आहे. तर युरोपियन युनियनचे देश मतदानाला गैरहजर राहिले.

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2014 04:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close