'माझ्या लेकीला कोणाची नजर न लागो', अमृता सिंहचे साराला काजळ लावतानाचे Photo Viral

'माझ्या लेकीला कोणाची नजर न लागो', अमृता सिंहचे साराला काजळ लावतानाचे Photo Viral

सारा अली खानचे असे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही विश्वास बसेल की बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा या काजळाचा टीका लावण्यावर खूप विश्वास ठेवतात.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : आपण अनेकदा पाहतो की, लहान मुलांना तयार केल्यानंतर त्यांची आई त्यांना काजळाचा टीका लावते. असं म्हटलं जातं की, काळा टीका लावल्यानंतर लहान मुलांचं वाईट नजरेपासून संरक्षण होतं आणि मुलांना दृष्ट लागत नाही असं म्हटलं जातं. हे फक्त लहान मुलांपुरतंच मर्यादित नसतं तर लग्नाच्या वेळी वर-वधूलाही काळा टीका लावला जातो.

भारतात खासकरून आई तिच्या मुलीला काजळाचा काळा टीका लावल्याशिवाय बाहेर जाऊ देत नाही. पण हा प्रकार फक्त सर्वसामान्यांच्या घरातच नाही तर बॉलिवूड सेलिब्रेटींच्या कुटुंबातही घडतो. सारा अली खानचे असे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही विश्वास बसेल की बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा या काळ्या टीक्यावर खूप विश्वास ठेवतात.

ग्लोबलस्टार प्रियांकाला आजही आहे ही 'मिडल क्लास' सवय, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

 

View this post on Instagram

 

What a beaitiful siblings goal😍@saraalikhan95 #ibrahimalikhan #saraalikhan #saraalikhan95 #pataudiprincess #sarakishayari

A post shared by S A R A A L I K H A N🎀 (@gorgeous_sara143) on

सारा अली खाननं काही दिवसांपूर्वीच भाऊ इब्राहिमसोबत एका मासिकासाठी फोटोशूट केलं. यावेळचे तिचे काही अनसीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात साराची आई अमृता सिंह लेकीला दृष्ट लागू नये म्हणून साराच्या कानामागे काळा टीका लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे इब्राहिम फनी फेस बनवताना दिसत आहे. साराचे हे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

SHOCKING! 'मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका' कार्तिक आर्यनची पॅपराजीला विनंती

सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलं आहेत. अमृतासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफनं अभिनेत्री करिना कपूरशी लग्न केलं. या दोघांना तैमुर नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. तर सारा आणि इब्राहिम पहिल्यांदाच एका मासिकाच्या कव्हर पेजवर एकत्र दिसणार आहे. सारानं मागच्याच वर्षी 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पादर्पण केलं होतं. त्यानंतर ती सिंबामध्ये दिसली. सध्या तिच्याकडे 'लव्ह आज कल 2' आणि 'कुली नंबर 1'  असे 2 सिनेमा आहेत.

अॅक्टिंगची हौस! मेंढपाळाने केलेला सलमान खानच्या गाण्याचा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

==========================================================

'370चं भांडवल करणारे 371 वर गप्प का?' शरद पवारांचा अमित शाहांना सवाल

Published by: Megha Jethe
First published: October 12, 2019, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading