23 जुलै : डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचं प्लँचेट स्टिंग ऑपरेशन उघड होऊन 24 तास उलटले नाहीत. पण, पोलीस किंवा सरकारकडून अजून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.
पण, दाभोलकर खून खटल्याचा तपास करत असताना प्लँचेटचा वापर केल्याबद्दल आम आदमी पार्टीने नाशिकमध्ये पोळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, गुलाबराव पोळ यांचा प्लँचेटमध्ये सहभाग असल्याचे पुरावे आता मिळाले आहेत तेव्हा त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय . पण, पोळ यांच्या वकिलांनी मात्र हे स्टिंग ऑपरेशन बनावट असल्याचा दावा केलाय.
तर प्लँचेट प्रकरणी गुलाबराव पोळ दोषी आढळल्यास कारवाई करू, असं सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघेंनी स्पष्ट केलंय.
Follow @ibnlokmattv |