आमचा तसा हेतू नव्हता, विचारेंची दिलगिरी

आमचा तसा हेतू नव्हता, विचारेंची दिलगिरी

  • Share this:

rajan_vichare23 जुलै : महाराष्ट्र सदनात घडलेल्या प्रकारबदल शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. मुस्लीम धर्माचा आम्ही आदर करतो, त्यामुळे कॅटरिंग सर्व्हिसच्या सुपरवायझरच्या धर्माला दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता असं स्पष्टीकरण राजन विचारे यांनी दिलंय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणावर सारवासारव करत आम्ही हिंदुत्ववादी असलो तरी असं कृत्य करणार नाही आणि करू शकत नाही असा खुलासा केलाय.

दरम्यान, महाराष्ट्र सदनातल्या घटनेचा मुद्दा काँग्रेसच्या सदस्यांनी लोकसभेत उपस्थित केला. यावरून संसदेतही गदारोळ झाला. लोकसभा एकदा तहकूबही करावी लागली. केरळचे खासदार एम.ए शनवास यांनी अर्शदच्या निवेदन लोकसभेत वाचून दाखवला.

सेनेचे खासदार अनंत गीते यांनी या खासदारांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर विरोधकांनी लोकसभेतून वॉकआऊट केलं. शिवसेनेचे खासदार माफी मागतील अशी ग्वाही संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडूंनी दिली. त्यानंतर राजन विचारे यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

First published: July 23, 2014, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading