धोनी ब्रिगेडची कमाल, लॉर्डसवर 28 वर्षांनंतर भारत जिंकला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2014 09:55 AM IST

धोनी ब्रिगेडची कमाल, लॉर्डसवर 28 वर्षांनंतर भारत जिंकला

india win21 जुलै : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्डस्‌च्या मैदानावर भारताने तब्बल 28 वर्षांनंतर ऐतिहासिक विजयाची नोंद केलीय. इंग्लंडला आपल्याच मायभुमीत धूळ चारत भारताने 95 रन्सने विजय मिळवलाय. या विजयाचा शिल्पकार ईशांत शर्माने तब्बल 7 विकेट्स घेत रेकॉर्ड केलाय. 1986 साली कपिल देव कर्णधार असताना भारताने पहिला कप मिळवला होता. त्यावेळी दिलीप वेंगसरकर यांनी शतक झळकावलं होतं.

चौथ्या दिवशी भारताची दुसर्‍या इनिंगमध्ये 342 रन्सवर ऑल आऊट झाली. भारताने 318 रन्सची आघाडी घेतली होती. इंग्लंडसमोर विजयासाठी 319 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. आजच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 214 रन्सची गरज होती पण ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडने नागी टाकली. तर जेम्स अँडरसनला रवींद्र जडेजाने रन आऊट करुन 88.2 ओव्हरमध्ये 223 रन्सवर इंग्लंडला रोखले. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 295 रन्स तर दुसर्‍या इनिंगमध्ये 342 रन्स केले होते. याला उत्तर देत इंग्लंडने पहिली इनिंग 319 रन्स बनवले तर दुसरी इनिंग 223 रन्सवर गुंडाळली गेली.

आजच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात मोइन अली 39 आणि जोय रुट 66 रन्सवर यांच्यामध्ये पाचव्या विकेटसाठी 101 रन्सची पार्टनरशीप झाली त्यामुळे ही पार्टनशीप भारतासाठी डोकेदुखी ठरती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण मध्यंतरानंतर ईशांत शर्माने मोइनची विकेट घेऊन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पहिल्या इनिंगमध्ये भुवनेश्वर कुमारने 82 रन्स देऊन सहा विकेट घेतल्या होत्या. लॉर्डसच्या मैदानावर पहिल्यांदाच भारतीय बॉलर्सनी एकाच इनिंगमध्ये सात विकेट घेण्याची कामगिरी केली. या अगोदर अमर सिंह, बिशन सिंह बेदी आणि भुवनेश्वर यांनी सहा-सहा विकेट घेतल्यात.

ईशांतने आपल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट बॉलिंग करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या अगोदरही ईशांतने 51 रन्स देऊन सहा विकेट घेण्याचा पराक्रम गाजवला होता. ईशांतने आपल्या करिअरमध्ये एक मॅचमध्ये 10 विकेट आणि सहा इनिंगमध्ये पाच विकेट मिळवल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावून भारताची स्थिती सुधारली होती. त्यानंतर दुसर्‍या इनिंगमध्ये मुरली विजयने सर्वाधिक 95 रन्स केलेत. लॉर्डसच्या मैदानावर धोनी ब्रिगेडच्या दमदार आणि संयमी खेळीच्या बळावर भारताने ऐतिहासिक विजय मिळवलाय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2014 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...