इंग्लंडसमोर 319 धावांचं टार्गेट

इंग्लंडसमोर 319 धावांचं टार्गेट

  • Share this:

shami_dhoni_wicket21   जुलै :  भारत-इंग्लंड लॉर्ड्स टेस्ट रंगतदार अवस्थेत. चौथ्या दिवशी भारत दुसर्‍या इनिंगमध्ये 342 रन्सवर ऑल आऊट झाला आहे.

भारताने 318 रन्सची आघाडी घेतली असून इंग्लंडसमोर विजयासाठी 319 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडला विजयासाठी अजूनही 214 रन्सची गरज आहे तर भारताला विजयासाठी 6 विकेट्सची आवश्यकता आहे.

भारताचा ओपनर मुरली विजय आणि धोनीने इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र धोनी 19 रन्सवर माघारी परतला तर मुरली विजय सेंच्युरी ठोकणार असं वाटत असतानाच 95 रन्सवर आऊट झाला. जडेजाने 68 रन्स ठोकून आपली करिअरमधील पहिली हाफ सेंच्युरी ठोकली आहे. दुसर्‍या टेस्टमध्येही भुवनेश्‍वर कुमारनं आपली हाफ सेंच्युरी ठोकली आणि भारताची आघाडी 318 रन्सवर नेली तर इंग्लंडनं आपल्या दुसर्‍या इनिंगला सावधपणे सुरुवात केली. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची 4 विकेट्सवर 105 रन्स अशी अवस्था झाली आहे.

First published: July 21, 2014, 8:40 AM IST

ताज्या बातम्या