ओएनजीसीच्या विहिरीतून गॅसगळती, कोणतीही जीवितहानी नाही

ओएनजीसीच्या विहिरीतून गॅसगळती, कोणतीही जीवितहानी नाही

  • Share this:

ONGC gas leak

20  जुलै :  मुंबईजवळच्या बॉम्बे हायमध्ये 'ओएनजीसी कंपनीच्या विहिरीतून काल (शनिवारी) गॅसगळती झाली. खोदकामादरम्यान गॅसगळती झाल्यानंतर त्वरित बचावकार्य हाती घेण्यात आले. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व कर्मचारी सुखरूप सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचा दावा कंपनीने केला.

मुंबईच्या समुद्र किनार्‍यापासून आत 'ओएनजीसी' कंपनीच्या वतीने खोदकाम सुरू होते. मात्र अचानक गॅसची गळती झाली. तत्काळ बचावकार्य हाती घेत घटनास्थळावरील 48 कर्मचार्‍यांची सुटका करून त्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. गळतीचा आढावा घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. शिवाय खबरदारीची उपाययोजना म्हणून कोस्ट गार्डनं तेल प्रदूषण प्रतिबंधक नौका वरुणा बॉम्बे हायजवळ नेऊन ठेवली आहे. तसेचनौदल आणि तटरक्षक दलालाही याची माहिती देण्यात आली. बचावकार्यासाठी कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर्सही कामात सहभागी झाले होते.

गॅसगळती अनपेक्षितरित्या झाली. सध्या ड्रिलिंग ऑपरेशन पूर्णपणे थांबवण्यात आलं आहे. गॅसगळती झालेली जागा शोधून काढण्यात यश आलंय, आणि घाबरण्याचं कारण नाही. या दुर्घटनेत सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही असं 'ओएनजीसी' कंपनीनं सांगितलं आहे.

First published: July 20, 2014, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading