'त्या' विमानावर का आणि कुणी हल्ला केला ?

'त्या' विमानावर का आणि कुणी हल्ला केला ?

  • Share this:

malaysian airline shot down18 जुलै : 'विमानाला अपघात' अशी बातमी जरी आली तर कुणाच्याही काळजाचा ठोका चुकतो पण युक्रेनजवळ एक 298 प्रवाशाचं विमान मिसाईल हल्ला करुन पाडण्यात आल्याची घटना घडली. अवघ्या जगाला या घटनेचा धक्का बसलाय.

या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाच्या अवशेषांमधून आतापर्यंत 180 मृतदेह काढण्यात आले आहेत. या विमानतील सगळेच्या सगळे 298 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत

. यात 173 डच नागरिक होते तर 44 मलेशियन नागरिक होते. पण या विमानावर हल्ला का आणि कुणी केला हा प्रश्न अवघ्या जगाला पडलाय. याबद्दलच्या या काही शक्यता....

 कोणी केला हल्ला ?

- 33,000 फुटांवरून उडणार्‍या जेट विमानाला पाडू शकतील अशी मोजकीच मिसाईल्स आहेत.

- जमिनीवरून आकाशात हल्ला करणारं बक मिसाईल तब्बल 49,000 हजारांवरच्या टार्गेटचा वेध घेऊ शकतं.

- तज्ज्ञांच्या मते एखादं सुसज्ज लष्करच इतक्या उंचीवर वेध घेऊ शकतं.

- तज्ज्ञांनुसार बंडखोर वापरत असलेली खांद्यावरून लाँच करता येणारी मिसाईल्स जास्तीत जास्त 15,000 फुटांवर पोहोचू शकतात.

- रशियन आणि युक्रेनियन ही दोन्ही लष्करं बक मिसाईल्सचा वापर करतात. यांना SA-11 नाव देण्यात आलं आहे.

- युक्रेनियन लष्कर वापरत असलेलं S-200 मिसाईल किंवा रशियन्स वापरत असलेले S-300 किंवा S-400 मिसाईल्स वापरण्यात आल्याचीही शक्यता आहे.

- अमेरिकन रिपोर्ट :  विमान कोसळण्याच्या आधीच हे जमिनीवरून आकाशात हल्ला करणार्‍या मिसाईल सिस्टीमची रडारवर नोंद झाली होती.

- अमेरिकन रिपोर्ट : विमानावर हे मिसाईल आदळल्यानंतर वाढलेल्या तापमानाची नोंद रडारवर झाली

- हा हल्ला नेमका कुठून करण्यात आला असावा हे शोधण्यासाठी आता अमेरिका या मिसाईलच्या रडारवर नोंद झालेल्या मार्गाची तपासणी करत आहे.

रशियांवर संशयाचे ढग

mh17_5 (1)मलेशियन एअरलाइन्सच्या विमानावर झालेल्या हल्ल्यानंतर आता रशिया आणि युक्रेनमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पण हा हल्ला नेमका कुणी केला याबद्दल अजूनही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

मलेशियन एअरलाइन्सचं बोईंग 777 जातीच एमएच 77 हे विमान ऍमस्टरडॅमकडून क्वालालांपूरला निघालं होतं. रशियाच्या सीमेजवळ पूर्व युक्रेनवरून उडत असताना या विमानावर हल्ला करून ते पाडण्यात आलं. जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या मिसाईल्सने हल्ला करून हे विमान पाडण्यात आलं असावं असा निष्कर्ष अमेरिकी अधिकार्‍यांनी काढलाय.

या विमानावर जिथे हल्ला झाला तो भाग युक्रेनमधल्या रशियन बंडखोरांचा तळ समजला जातो. त्यामुळे हा हल्ला कोणी केला यावरून युक्रेन आणि रशियाने एकमेकांवर आरोप केले आहेत. हल्ल्यात रशियन लष्करी गुप्तचर अधिकार्‍यांचा हात असल्याचा आरोप युक्रेनने केलाय, तर युक्रेनमधल्या फुटीरवादी गटांविरोधात युक्रेनच्या लष्करी मोहिमेमुळे हा हल्ला घडल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलंय.

mh17_3 (1)या हल्ल्याचं लक्ष्य रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचं विमान असावं, अशी बातमी रशियन टीव्हीने दिलीय. कारण ज्या मार्गाने बोईंग 777 गेलं, त्याच मार्गावरून आणि त्याच उंचीवरून 40 मिनिटांनी पुतिन यांचं आयएल 96 हे विमान जाणार होतं. या अपघाताची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौैकशी व्हावी, अशी मागणी ब्रिटनने केलीय तर अमेरिकेनं या अपघाताच्या चौकशीसाठी सहकार्य करण्याचं आश्‍वासन दिलंय.

मलेशियन एअरलाइन्सच्या विमानावर हा हल्ला नेमका कुणी आणि कसा केला असावा याबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. पण या हल्ल्यात 298 निरपराध प्रवाशांचा हकनाक बळी गेला.

एआयडीएसच्या 100 वैज्ञानिक आणि संशोधकांचा मृत्यू

विमानावरच्या हल्ल्यामुळे जागतिक एआयडीएस संशोधनाला मोठा धक्का बसलाय. मेलबर्नला कॉन्फरन्ससाठी जाणार्‍या 100 वैज्ञानिक आणि संशोधकांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. हे सगळे संशोधक ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेसाठी या विमानातून जात होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय एड्स सोसायटीचे माजी अध्यक्ष जोएप लांज हेसुद्धा होते.आंतरराष्ट्रीय एड्स सोसायटीने या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केलाय.

First published: July 18, 2014, 10:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading