स्टोअर किपर ते महाठग !

स्टोअर किपर ते महाठग !

  • Share this:

kbcl_scam18 जुलै : 'अमुक अमुक पैसे भरा सदस्य व्हा, दोन सदस्य करा पैसे दुप्पट मिळवा, तीन सदस्य करा भेट वस्तू मिळवा' असं आमिष दाखवून आजपर्यंत अनेक लुटारू कंपन्यांनी आमिष पिपासू लोकांना लुटलंय. पण तरीही पैशापाई अशा घटना वारंवार घडत आहे आणि लोक त्याला बळी पडत आहे. नाशिकमध्ये असाच प्रकार उघड झाला. नाशिकमध्ये केबीसीएल इन्वेस्टमेंट या कंपनीचा सर्वेसर्वा महाठग भाऊसाहेब चव्हाण यांने तब्बल 30 कोटींना लोकांना गंडा घातलाय आणि आतापर्यंतच्या ठगांसारखा तोही पसार झालाय.

या केबीसीएल घोटाळ्याविरोधात आतापर्यंत 346 तक्रारी दाखल झाल्या आहेत. साधारण 10 कोटींचा हा घोटाळा असल्याचा अंदाज आहे. नाशिकच्या आडगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यासाठी एक टीम नेमण्यात आली आहे. केबीएल घोटाळ्याचा महाठग मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण याला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांच्या 3 तुकड्या रवाना झाल्या आहेत. 8 मार्चला एका निनावी अर्जाच्या आधारे नाशिक पोलिसांनी संशयास्पद व्यवहाराबद्दल भाऊसाहेब चव्हाणला अटक केली होती. त्याच्या ऑफिसमधून 4 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आणि 30 कोटींची बँक खाती गोठवण्यात आली होती. या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करावी अशी माहिती सेबीलाही कळवण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्याची योग्य ती दखल घेण्यात आली नाही. भाऊसाहेबला जामीन मिळाला आणि पासपोर्टही. या तीन महिन्यात कंपनीच्या फसवणुकीचा आकडा तिप्पट झाला आणि संधी मिळताच भाऊसाहेबानं आपल्या पत्नीसह पोबारा केला.

कोण आहे हा महाठग ?

आज लाखो गुंतवणुकदारांच्या डोळ्यात पाणी काढणारा भाऊसाहेब चव्हाण गेल्या 5 वर्षांपासून अनेकांसाठी भाऊसाहेब चव्हाण श्रीमंतीचा पासवर्ड झाला होता. बघुया कोण आहे हा भाऊसाहेब आणि काय होते केबीसीच्या इन्वेस्टमेंटचे प्लॅन्स. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या हरनूल गावचा भाऊसाहेब बीकॉम पर्यंत शिकलाय. एका कंपनीत स्टोअर किपर म्हणून काम करत होता. 20 नोव्हेंबर 2009 ला त्यानं ही कंपनी स्थापन केली. त्यात भाऊसाहेबचा मेव्हणा आणि नाशिकमधलाच पोलीस कर्मचारी संजय जगताप याची महत्वाची साथ मिळाली. जगताप सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. साखळी पद्धतीनं या कंपनीनं लोकांना गुंतवून घेतलं.

केबीसीएलच्या योजना

  • तिसर्‍या महिन्यात तिप्पट रक्कम
  • 36 सदस्य केल्यास गोव्याची सहल
  • 756 सदस्य केल्यास 51 हजार पगार
  • 2,000 सदस्य केल्यास 7 लाखांचे दागिने
  • 12,000 सदस्य केल्यास 51 लाखांचा बंगला

 चव्हाणच्या इतर कंपन्या

  • - डीसीबी मल्टी लेव्हल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड
  • - एफएक्स रिच बुलियन फायनान्स सर्व्हिसेस
  • - केबीसीएल क्लब रिसॉर्ट
  • - केबीसीएल प्लॉटर्स प्रायव्हेट लिमिटेड

नांदेडमध्येही कोट्यवधींना गंडा

केबीसीएल कंपनीचा घोटाळा उघड झाल्यानंतर या ठग कंपनीने गंडवलेले अनेक जण समोर येत आहेत. नांदेड मध्येही या कंपनीने शेकडो जणांना कोट्यवधी रुपयांना फसवल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे नांदेडमध्ये फसवलेले बहुतांश जण हे गुरूद्वारा बोर्डाचे कर्मचारी आहेत. गुरूद्वारा बोर्डातील निवृत्त कर्मचारी गुरुचरणसिंघ सुखमनी हे केसीबी कंपनीचे एजंट होते. त्यांनी बोर्डातल्या कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या योजना आणि आमिषं दाखवून केबीसीएलमध्ये पैसा गुंतवायला लावले. पैसे दुप्पट होण्याच्या आमिषाला बळी पडून गुरुद्वारातील या

कर्मचार्‍यांनी आपले पैसे गुंतवले. काहींनी निवृतीची रक्कम या कंपनीत गुतवंली. अनेकांनी तर चक्क व्याजाने पैसे काढुन या ठग कंपनीत भरले. के बी सी कंपनीच्या ठगीच्या बातम्या पाहून सर्वांना धक्का बसला. या 100 कर्मचार्‍यांनी जवळपास 1 कोटी रूपये गुंतवले आहे. या कर्मचार्‍यांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. कंपनीचा एंजट गुरुचरण सिंग सुखमनी सध्या फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2014 04:02 PM IST

ताज्या बातम्या