मुंबईकर रहाणेंची शतकी खेळी, भारत 9 विकेट 290 धावा

मुंबईकर रहाणेंची शतकी खेळी, भारत 9 विकेट 290 धावा

  • Share this:

13rahane17 जुलै : क्रिकेटची पंढरीत लॉर्डसच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये 'गोर्‍यासाहेबां'विरोधात मुंबईकर अजिंक्य रहाणे धावून आलाय. अजिंक्य रहाणेच्या झुंजार शतकी खेळीने भारताचा डाव सावरलाय. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्डसवर सुरू असलेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेटवर 290 रन्स केले.

अजिंक्य रहाणेने झुंजार सेंच्युरी झळकावत भारताचा डाव सावरला. रहाणेने एक बाजू लावून धरत 15 फोर आणि एक सिक्स ठोकत आपली दुसरी टेस्ट सेंच्युरी झळकावली. मात्र अजिंक्य 103 रन्सवर आऊट झाला. रहाणे वगळता भारताचे सर्व आघाडीचे बॅटसमन इंग्लंडच्या बॉलर्ससमोर अक्षरश: ढेपाळले.

मुरली विजय आणि शिखर धवन या ओपनर्सनी पुन्हा एकदा खराब सुरवात केली. पहिल्या टेस्टमधील शतकवीर मुरली विजयकडून या टेस्टमध्येही अपेक्षा होत्या मात्र मोठी खेळी करण्यात तोही अपयशी ठरला. विराट कोहलीने सुरूवात तर जोरदार केली.

पण लवकरच तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. चेतेश्वर पुजारा, कॅप्टन महेंद्रसिंग धोणी,रविंद्र जडेजा,स्टुअर्ट बिन्नी हे ही झटपट परतले. अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार यांनी केलेल्या 90 रन्सच्या महत्वपूर्ण पार्टनरशीपमुळे भारताचा डाव सावरला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 4 तर स्टुअर्ड ब्रॉडने 2 विकेटस घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2014 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading