S M L

ब्रिक्स बँकेच्या स्थापनेचा निर्णय, अध्यक्षपदाचा मान भारताकडे

Samruddha Bhambure | Updated On: Jul 16, 2014 10:30 AM IST

ब्रिक्स बँकेच्या स्थापनेचा निर्णय, अध्यक्षपदाचा मान भारताकडे

16  जुलै :  'ब्रिक्स' परिषदेत प्रथमचं सहभागी होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्राझील दौर्‍याला अनपेक्षित यश मिळाल आहे. विकसनशील पाच देशांच्या भेटीत 'ब्रिक्स विकास बँक' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तिचे अध्यक्षपद भारताला देणात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारपासून ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या सहाव्या 'ब्रिक्स' परिषदेत सहभागी झाले आहे. दोन दिवसांच्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी 'ब्रिक्स' सदस्य देशांच्या प्रमुखांशी त्यांनी भेट घेतली. यात हा प्रस्ताव मांडण्यात आला. सुरुवातीला या बँकेत 100 अब्ज डॉलर्सचं भागभांडवल गंुतवलं जाणार आहे तर प्रारंभिक सदस्यता भांडवल 50 अब्ज डॉलर्स असेल.. या बँकेच्या निधीवर सर्व सदस्य राष्ट्रांचा म्हणजेच भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचा यांचा समान हक्क असेल. या बँकेचं मुख्यालय चीनच्या शांघायमध्ये असेल. या बँकेचं पहिलं अध्यक्षपद भूषवण्याचा मान भारतीय व्यक्तील मिळणार आहे तर बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचं पहिलं चेअरमनपद रशियन व्यक्ती भूषवेल. या बँकेचा निधी आपत्कालीन संकटांसाठी ब्रिक्सचे सदस्य असलेल्या पाच देशांसाटी वापरला जाईल.

दरम्यान, या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. सुमारे 40 मिनीटे ही बैठक झाली. यात मोदींनी सुरक्षा आणि उर्जा क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्यावर भर दिला. तसेच पुतिन यांना भारत दौ-यावर निमंत्रित केल आहे.

दहशतवाद हा माणुसकीला घातकी - मोदी

Loading...
Loading...

ब्रिक्स परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादासाठी निरनिराळ्या फुटपट्‌ट्या वापरल्या जात असल्यामुळे त्याचा परिणामकारकपणे सामना केला जाऊ शकत नाही, असं स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. कोणताही दहशतवाद हा माणुसकीविरोधात असतो, असं ते यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2014 10:24 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close